Tuesday 2 August 2011

मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करणार - अण्णासाहेब जावळे


Saturday, March 19, 2011
लातूर - मराठा आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी ता. 22 मार्च रोजी येथील शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आत्मदहन करण्यात येणार आहे, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी येथे शुक्रवारी (ता. 18) पत्रकार परिषदेत दिला.

पुण्यात काही दिवसापूर्वी संघटनेचे सातवे अधिवेशन झाले आहे. शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, ही प्रमुख मागणी होती. या प्रश्‍नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केवळ गंभीर विचार करू अशीच भाषा बोलत आहेत. या राज्यात मेल्याशिवाय काही मिळत नाही असेच दिसू लागले आहे. त्यामुळे ता. 22 मार्च रोजी आपण तसेच राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते आत्मदहन करणार असल्याचे श्री. जावळे म्हणाले.

मराठा आरक्षणाला लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, छगन भुजबळ, बंजारा समाजाचे हरिभाऊ राठोड यांनी पाठिंबा दर्शविला आहे. सध्या आमचे एकच मिशन मराठा आरक्षण आहे. ता. 22 मार्च पासून आंदोलन सुरू होणार आहे. या मागणीसाठी कार्यकर्ते दहशतवादी बनतील. त्याची जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही श्री. जावळे यांनी दिला. काही दिवसापूर्वी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यावर श्री. जावळे म्हणाले, की हे पदाधिकारी पळपुटे होते. संघटनेत फुट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी राजीनामे दिले नाहीत आपण त्यांना राजीनामे मागितले होते. यावेळी माणिक शिंदे उपस्थित होते.

मराठा नेत्यांकडूनच अन्यायराज्यात सत्तेत अनेक मराठा नेते आहेत. आतापर्यंत झालेले बहुतांश मुख्यमंत्री हे मराठाच होते. त्यांनीच या समाजावर अन्याय केला आहे. मराठ्यांच्याच पुढाऱ्यांनी मराठ्यांना संपविण्यासाठी आरक्षणाचा निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे श्री. जावळे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment