सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 02, 2011 AT 01:00 AM (IST)
बुलडाणा - जिल्हापरिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अशोक राऊत यांच्या कक्षात घुसून त्यांना जाळण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारी फसला. या प्रकारानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक राऊत हे संपूर्ण स्वच्छता कक्षातील कर्मचाऱ्यांची बैठक घेत होते. यावेळी विस्तार अधिकारी घाईट, संदीप पाटील, समीर बेग यांच्यासह पाच ते सहा कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या ठिकाणी शेलसूर येथील छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत रिंढे व आणखी पाच ते सहा जण कक्षात घुसले.
सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक राऊत हे संपूर्ण स्वच्छता कक्षातील कर्मचाऱ्यांची बैठक घेत होते. यावेळी विस्तार अधिकारी घाईट, संदीप पाटील, समीर बेग यांच्यासह पाच ते सहा कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या ठिकाणी शेलसूर येथील छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत रिंढे व आणखी पाच ते सहा जण कक्षात घुसले.
"मुख्य कार्यकारी अधिकारी कुठे आहेत, तुमचे येथे काय सुरू आहे असे म्हणत कक्षातील या कर्मचाऱ्यांना बाहेर काढा' असे श्री. राऊत यांना ते म्हणाले. यावेळी भारत रिंढे व इतरांच्या हातात काठ्या तसेच एका पिशवीत पेट्रोल व रॉकेल भरलेल्या बॉटल्या होत्या. संबंधितांचा हेतू लक्षात येताच राऊत यांनी, "तुम्ही आपले काम सांगा, कर्मचारी बाहेर जाणार नाहीत', असे सांगितले. यानंतर बॉटलचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करीत असताना कर्मचाऱ्यांनी या सर्वांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे ज्वलनशील पदार्थ या झटपटीत सांडले. राऊत यांच्या कक्षात सुरू असलेली आरडाओरड ऐकूण इतर कक्षातील कर्मचारी तिकडे धावले. त्यामुळे भारत रिंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बॉटल व काठ्या तेथेच टाकून पळ काढला. हा प्रकार श्री. राऊत यांनी तातडीने लोकशाहीदिनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश ठुबे, प्रकल्प संचालक संजय कापडणीस यांना दूरध्वनीवरून कळविला.
या प्रकाराची माहिती जिल्हापरिषदेसह शहरात सर्वत्र पसरली. तातडीने शहर पोलिसांचा ताफा श्री. राऊत यांच्या कक्षात दाखल झाला. श्री. राऊत यांच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपी भारत रिंढे, दत्ता जाधव, देवानंद विचारे, सुनील घेवंदे, शकील खॉं अनीस खॉं, संतोष गंडे या सहा जणांना चिखली मार्गावरील गोलांडे लॉन परिसरातून नाईक पोलिस कॉन्स्टेबल विलास काकड, पोलिस कॉन्स्टेबल नीलसिंग चव्हाण यांनी शिताफीने ताब्यात घेतले.
यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी घटनेची माहिती घेत पोलिस कर्मचाऱ्यांना तपासासाठी मार्गदर्शन केले. घटनेच्यावेळी श्री. राऊत यांच्या कक्षात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही जबानी घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेचे जिल्ह्यात एकच पडसाद उमटले असून, सर्व कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन केले
No comments:
Post a Comment