पिंपरी - सांगवी येथे पीडब्ल्यूडीच्या मैदानात गुरुवारी (ता. 24) आयोजित छावासंघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवराळ आणिप्रक्षोभक भाषणांमुळे मोठा गदारोळ उडाला. संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेबजावळे-पाटील यांना ताब्यात घेण्यास विरोध झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवरलाठीमार केला. याचवेळी दोन कार्यकर्त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने वातावरणतणावपूर्ण बनले होते. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात पाच पोलिसजखमी झाले. रात्री उशिरापर्यंत पावणे दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या अधिवेशनात भाषण करताना श्री. जावळे-पाटील यांनी आरक्षणाबाबत त्वरितनिर्णय घेण्याची आग्रही मागणी केली. ते म्हणाले, 'पोलिसांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्ककरून त्यांच्याकडून ठोस आश्वासन घ्यावे. तसा ठोस निर्णय लगेच झाला नाही, तरपुणे-मुंबई महामार्ग रोखण्यात येईल.'' याचवेळी त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचीनावे घेऊन शिवराळ भाषेत टीका केली. त्यामुळे त्यांचे भाषण रोखून पोलिसांनी त्यांनाताब्यात घेतले. त्या वेळी जावळे यांना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनला कार्यकर्त्यांनीगराडा घातला. त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्या वेळीकार्यकर्त्यांची पळापळ झाली. मात्र, त्यांनी पोलिसांना प्रत्युत्तर देण्यासाठी दगडफेककेली. या वेळी बालाजी निकम आणि राजू नरके या दोन कार्यकर्त्यांनी रॉकेल ओतूनजाळून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यातघेतल्याने अनर्थ टळला. या प्रकरणात कार्यकर्तेही जखमी असल्याचा दावा संघटनेनेकेला आहे.अधिवेशनानिमित्त सांगवी येथे उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सहायक आयुक्तविष्णू माने, वरिष्ठ निरीक्षक शांताराम तायडे, महादेव चव्हाण, निरीक्षक भागवतसोनावणे, भीमराव टेळे यांच्यासह दीडशे पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनातकरण्यात आला होता.दगड-बाटल्या भरलेली मोटार जप्त
अधिवेशनातील संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन सांगवी येथे मोठ्या प्रमाणात पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यातच गोंधळ झाल्यानंतर वाहनांची तपासणीकरण्यात आली. त्यात बोलेरो (एमएच 20- एजी 3293) गाडीत दगड, बिअर-सोडावॉटरच्या बाटल्या भरलेल्या आढळल्याने पोलिसांनी मोटार जप्त
अधिवेशनातील संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन सांगवी येथे मोठ्या प्रमाणात पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यातच गोंधळ झाल्यानंतर वाहनांची तपासणीकरण्यात आली. त्यात बोलेरो (एमएच 20- एजी 3293) गाडीत दगड, बिअर-सोडावॉटरच्या बाटल्या भरलेल्या आढळल्याने पोलिसांनी मोटार जप्त
No comments:
Post a Comment