Tuesday, 2 August 2011

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पेटविण्याचा प्रयत्न!


सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 02, 2011 AT 01:00 AM (IST)
Tags: buldhana,   crime,   vidarbha
बुलडाणा - जिल्हापरिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अशोक राऊत यांच्या कक्षात घुसून त्यांना जाळण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारी फसला. या प्रकारानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली असून, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक राऊत हे संपूर्ण स्वच्छता कक्षातील कर्मचाऱ्यांची बैठक घेत होते. यावेळी विस्तार अधिकारी घाईट, संदीप पाटील, समीर बेग यांच्यासह पाच ते सहा कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या ठिकाणी शेलसूर येथील छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत रिंढे व आणखी पाच ते सहा जण कक्षात घुसले.
"मुख्य कार्यकारी अधिकारी कुठे आहेत, तुमचे येथे काय सुरू आहे असे म्हणत कक्षातील या कर्मचाऱ्यांना बाहेर काढा' असे श्री. राऊत यांना ते म्हणाले. यावेळी भारत रिंढे व इतरांच्या हातात काठ्या तसेच एका पिशवीत पेट्रोल व रॉकेल भरलेल्या बॉटल्या होत्या. संबंधितांचा हेतू लक्षात येताच राऊत यांनी, "तुम्ही आपले काम सांगा, कर्मचारी बाहेर जाणार नाहीत', असे सांगितले. यानंतर बॉटलचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करीत असताना कर्मचाऱ्यांनी या सर्वांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे ज्वलनशील पदार्थ या झटपटीत सांडले. राऊत यांच्या कक्षात सुरू असलेली आरडाओरड ऐकूण इतर कक्षातील कर्मचारी तिकडे धावले. त्यामुळे भारत रिंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बॉटल व काठ्या तेथेच टाकून पळ काढला. हा प्रकार श्री. राऊत यांनी तातडीने लोकशाहीदिनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश ठुबे, प्रकल्प संचालक संजय कापडणीस यांना दूरध्वनीवरून कळविला.
या प्रकाराची माहिती जिल्हापरिषदेसह शहरात सर्वत्र पसरली. तातडीने शहर पोलिसांचा ताफा श्री. राऊत यांच्या कक्षात दाखल झाला. श्री. राऊत यांच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपी भारत रिंढे, दत्ता जाधव, देवानंद विचारे, सुनील घेवंदे, शकील खॉं अनीस खॉं, संतोष गंडे या सहा जणांना चिखली मार्गावरील गोलांडे लॉन परिसरातून नाईक पोलिस कॉन्स्टेबल विलास काकड, पोलिस कॉन्स्टेबल नीलसिंग चव्हाण यांनी शिताफीने ताब्यात घेतले.
यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी घटनेची माहिती घेत पोलिस कर्मचाऱ्यांना तपासासाठी मार्गदर्शन केले. घटनेच्यावेळी श्री. राऊत यांच्या कक्षात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही जबानी घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेचे जिल्ह्यात एकच पडसाद उमटले असून, सर्व कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन केले

बुलढाण्यात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न


* छावा संघटनेचे सात कार्यकर्ते अटकेत
* कर्मचाऱ्यांचे उद्या जिल्ह्य़ात ‘कामबंद’ आंदोलन
बुलढाणा, १ ऑगस्ट/ प्रतिनिधी

चिखली तालुक्यातील शेलसूर येथील जलस्वराज्य प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी योग्य ती कारवाई झाली नाही, असा आरोप करीत अखिल भारतीय छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह संघटनेच्या त्याच्या सात कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात बुलढाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक राऊत यांच्या अंगावर व कार्यालयात पेट्रोल व रॉकेल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या जिल्ह्य़ात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत रामचंद्र रिंढे (३८)(रा. शेलसूर, ता. चिखली), पदाधिकारी दत्ता मधुकर जाधव (२५)(रा. करवंड), सुनील नाना घेवंदे (२४)(रा.चंदनपूर), देवानंद गोविंद विचारे (३०)(रा. बुलढाणा), शकील अनिल पठाण (२३)(रा.शेलसूर), संतोष दत्तात्रय गंडे (२४)(रा.पळसखेड सपकाळ, विश्वास कैलास बोराडे (२४)(रा. शेलसूर) या सात जणांना अटक केली आहे. देवानंद विचारे वगळता इतर सर्व आरोपी चिखली तालुक्यातील आहेत. राऊत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज दुपारनंतर सरकारी व जि.प. अधिकारी तसेच, कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळला.
या घटनेची हकीकत अशी की, आज साडे तीन वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक राऊत यांच्या दालनात संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. त्याच वेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत रामचंद्र रिंढेंसह हे कार्यकर्ते त्यांच्या कक्षात बळजबरीने शिरले. त्यावेळी त्यांच्याजवळ पेट्रोल व रॉकेलने भरलेल्या बाटल्या, हातात लाठय़ाकाठय़ा होत्या. वीस ते चाळीस वयोगटातील या सर्व युवकांनी अतिशय संतापाच्या भरात मुख्य कार्यकारी अधिकारी ठुबे कोठे आहेत, अशी विचारणा केली. राऊत काही बोलण्याच्या आतच भारत रिंढे व त्याच्या सहकाऱ्यांनी राऊत यांच्या अंगावर व कार्यालयात रॉकेल व पेट्रोल फेकले. हे युवक काडीपेटीने राऊत यांना व कार्यालय पेटवण्याच्या बेतात असतांना तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळील काडीपेटी हिसकावून त्यांना कार्यालयाबाहेर हाकलले. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी या घटनेची तातडीने माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दंगा काबू पथकासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. पोलिसांनी सर्व आरोपींना तातडीने अटक केली. पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पाटील, उपअधीक्षक भुसारे, निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
शेलसूर येथील जलस्वराज्य प्रकल्प व ग्रामीण विकासाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात छावा संघटनेचे भारत रिंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र, या तक्रारींची थातूरमातूर चौकशी करून प्रकरणे दडपण्यात आली. त्यामुळे चिडून जाऊन रिंढे व त्यांच्या साथीदारांनी हा अघोरी प्रकार केल्याची या परिसरात चर्चा होती. या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ माजली. सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जि.प.समोरील पटांगणात गर्दी केली. राऊत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सरकारी अधिकारी व कर्मचारी, जि.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी चार वाजतानंतर दोन तास काम बंद आंदोलन पुकारले. दोषी आरोपींविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी अधिकारी व कर्मचारी संघटनांनी केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारत रिंढे व  त्यांच्या साथीदाराच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा व दंगल घडवण्याचा प्रयत्न या व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस कोठडीत डांबले. या प्रकरणाची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन कडक कारवाईचे आदेश जिल्हा व पोलीस प्रशासनास दिले आहेत.  
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=173939%3A2011-08-01-18-31-11&catid=25%3A2009-07-09-02-01-06&Itemid=2#.TjeRYs1rlMc.facebook

पंचायत समितीस टाळे ठोकले


Latur News
Thursday, June 23, 2011 AT 05:00 AM (IST)

लातूर (latur) - तांदुळवाडी ग्रामपंचायत सदस्यांकडे सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी व गैरव्यवहार प्रकरणी बोगस ग्रामसभा व भ्रष्टाचारप्रकरणी ग्रामसेवक बनसोडे यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अन्यथा छावा संघटना व तांदुळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा देऊन लातूर पंचायत समितीचा जाहीर निषेध करत पंचायत समितीला टाळे ठोकण्यात आले. यावेळी छावाचे ऍड. गणेश गोमचाळे, आकाश पाटील, तानाजी कोदरे, सिदाजी जगताप, विवेकानंद साळुंके, पद्माकर भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित हो

छावाच्या दणक्याने शेतकऱ्यांना मिळाले बियाणे


Beed News
Wednesday, June 08, 2011 AT 05:00 AM (IST)
व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत
बीड (beed) - जिल्ह्यात खत आणि बियाण्यांची टंचाई जाणवत असतांना व्यापारी मात्र बियाण्यांचा साठा करुन शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. मोंढ्यातील व्यंकटेश ऍग्रो एजन्सीमध्ये कपाशीचे बियाणे साठा करुन ठेवल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी छापा मारुन जप्त केलेले बियाणे आज सकाळी पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. बियाण्याचा साठा केल्या प्रकरणी व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहिणी नक्षत्रात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाल्याने यावर्षी शेतकरी कापसाची लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात कापसाच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी असतांना पुरवठा मात्र फारच अल्प प्रमाणात होत आहे. जो पुरवठा होत आहे तोही व्यापारी आपल्याकडेच साठा करुन ठेवत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शहरातील मोंढा भागात असलेल्या व्यंकटेश ऍग्रो एजन्सीमध्ये कपाशीचे बियाणे साठा करुन ठेवले असल्याबाबतची मागणी अखिल भारतीय छावाचे जिल्हाप्रमुख अशोक रोमण यांना मिळाल्यावरुन छावाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी छापा टाकुन हे बियाणे ताब्यात घेतले. त्यानंतर आज सकाळी पोलिस बंदोबस्तात या बियाण्याच्या बॅग छापील किंमतीत वाटण्यात आल्या. याबरोबरच कलंत्री यांच्या दुकानात असलेला बियाण्याचा स्टॉकही पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. छावाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या मोहीमेमुळे शेतकऱ्यांना वेळेत बियाणे मिळाले आहे. दरम्यान साठेबाजी करुन मल्लीका बीटी कापुस बियाणे विक्री करणारे व्यंकटेश एजन्सीचे मालक केदारनाथ जाजू यांच्या दुकानात कृषी अधिकारी एन.एस. राऊत यांच्या पथकान छापा टाकुन बियाणे जप्त केले. याबाबतचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी व्यंकटेश ऍग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत केला आहे. दरम्यान, छावा व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आ

तोडफोड आंदोलन करण्याचा इशारा


Tuesday, April 26, 2011
पारोळा -  तालुक्‍यात खुलेआम विविध अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे 30 एप्रिलपर्यंत बंद न केल्यास तोडफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक शरद घुगे यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय असा : पारोळा तालुक्‍यात सद्यःस्थितीत सर्रास अवैध धंद्ये सुरू आहेत. विशेषतः सट्टा (मटका), जुगार, गावठी दारू अड्डे, पैसे लावून खेळविण्यात येणारा कॉइन गेम असे अनेक अवैधधंदे शहरासह तालुक्‍यात बोकाळले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, तरुणी व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी शहरासह तालुक्‍यातील सर्व अवैध धंदे 30 एप्रिलपर्यंत बंद न केल्यास एक मेस (महाराष्ट्र दिनी) अखिल भारतीय छावा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते स्वतः हातात दंडुके घेऊन सुरू असलेले हे अवैधधंद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करतील. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण झाल्यास, तसेच होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील, अशा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नेरकर, तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष दिनेश पाटील, तालुका संपर्कप्रमुख विजय भिला पाटील, डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फॅक्‍सद्वारे पाठविण्यात आल्या आ

मराठा आरक्षणासाठी पुन्हा नवे 'शिलेदार'


Saturday, December 04, 2010
मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटनांत मानापानाचे नाट्य सुरू असतानाआरक्षणाची धुरा खांद्यावर घेतलेल्या "सरदारांनाबगल देतनव्या शिलेदारांनी संघर्षसमिती स्थापन केली आहेडॉमनीष वडजे यांच्या अध्यक्षतेखाली "मराठा संघर्षसमिती'ने मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्याची तयारी सुरू केली आहे.समितीमध्ये दहा मराठा संघटनांचा सहभाग असून कुणबी सेनाही या समितीमध्येसहभागी झाली आहेमात्र आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमकअसलेल्या मराठा सेवा संघसंभाजी ब्रिगेड आणि शिवसंग्राम या संघटनांचा यामध्येसमावेश नाही.मराठा समाजाला "ओबीसी'मध्ये समाविष्ट करून 25 टक्के आरक्षण मिळावेअशी प्रमुखमागणी घेऊन ही समिती काम करणार असल्याचे अध्यक्ष डॉवडजे यांनी सांगितले.मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे दोन्ही समाज एकच असूनयामध्ये फरक नसल्याचेमत या समितीने व्यक् केले आहेमात्र या वादाचा फायदा घेत समाजात मतभेद निर्माणकरणाऱ्या नेत्यांना धडा शिकवून नवीन समिती आरक्षणाचा मुद्दा हाती घेत असल्याचेवडजे यांनी स्पष्ट केले.शिवसंग्रामाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणकृती समितीची स्थापना झाली होतीमात्र यामध्ये फूट पडल्याने सुरेश पाटील यांच्याअध्यक्षतेखाली समितीची फेररचना करण्यात आलीदोन्ही संघर्ष समित्यांनंतर नव्यानेस्थापन झालेल्या "मराठा संघर्ष समिती'मध्ये या नेत्यांना बगल देतनवीन तरुण नेत्यांनीमराठा आरक्षणाची हाक दिली आहे.मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते किशनरावजी वरखिंडेछावा संघटनेचे प्रादेविदास वडजे,अध्यक्ष आण्णासाहेब जावळे आणि किसन खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन समितीकाम करणार असल्याचे डॉवडजे यांनी स्पष्ट 

'छावा'च्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न


Tuesday, March 22, 2011
जळगाव - मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी शासनाने मंजूर करावी यामागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला.पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.शिवजयंतीच्या निमित्ताने छावा संघटनेच्या युवकांनी आज दुपारी साडेबारा वाजताजळगाव येथील जीएसमैदानावरील शिवपुतळ्याजवळ आंदोलन केले. "एकचमिशनमराठा आरक्षण', मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेअशा घोषणातआठ युवकांनी अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.अग्नीशामन दलाच्या वाहनांना पाचारण करून त्यांच्या अंगावर पाण्याचा फवारामारण्यात आला

मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करणार - अण्णासाहेब जावळे


Saturday, March 19, 2011
लातूर - मराठा आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी ता. 22 मार्च रोजी येथील शिवाजी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आत्मदहन करण्यात येणार आहे, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी येथे शुक्रवारी (ता. 18) पत्रकार परिषदेत दिला.

पुण्यात काही दिवसापूर्वी संघटनेचे सातवे अधिवेशन झाले आहे. शासनाने मराठा आरक्षण जाहीर करावे, ही प्रमुख मागणी होती. या प्रश्‍नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केवळ गंभीर विचार करू अशीच भाषा बोलत आहेत. या राज्यात मेल्याशिवाय काही मिळत नाही असेच दिसू लागले आहे. त्यामुळे ता. 22 मार्च रोजी आपण तसेच राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्ते आत्मदहन करणार असल्याचे श्री. जावळे म्हणाले.

मराठा आरक्षणाला लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, छगन भुजबळ, बंजारा समाजाचे हरिभाऊ राठोड यांनी पाठिंबा दर्शविला आहे. सध्या आमचे एकच मिशन मराठा आरक्षण आहे. ता. 22 मार्च पासून आंदोलन सुरू होणार आहे. या मागणीसाठी कार्यकर्ते दहशतवादी बनतील. त्याची जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही श्री. जावळे यांनी दिला. काही दिवसापूर्वी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यावर श्री. जावळे म्हणाले, की हे पदाधिकारी पळपुटे होते. संघटनेत फुट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी राजीनामे दिले नाहीत आपण त्यांना राजीनामे मागितले होते. यावेळी माणिक शिंदे उपस्थित होते.

मराठा नेत्यांकडूनच अन्यायराज्यात सत्तेत अनेक मराठा नेते आहेत. आतापर्यंत झालेले बहुतांश मुख्यमंत्री हे मराठाच होते. त्यांनीच या समाजावर अन्याय केला आहे. मराठ्यांच्याच पुढाऱ्यांनी मराठ्यांना संपविण्यासाठी आरक्षणाचा निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे श्री. जावळे यांनी सांगितले

मराठा आरक्षणावरून उद्रेक


सांगवीत छावा कार्यकर्त्यांवर लाठीमार
१०० अटकेत
 पोलीस जखमी
पिपरी/सांगवी दि२४ ( प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अखिल भारतीयछावा मराठा युवा संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानेसांगवीत संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली.पदाधिकाऱ्यांना पोलिसव्हॅनमधून घेऊन जात असतानाशेकडो कार्यकर्ते पोलीसव्हॅनमागे धावू लागलेत्याचवेळी पांगविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्लाकेलातर संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केलीया धुमश्चक्रीत सहापोलीस आणि पन्नासहून अधिक कार्यकर्ते जखमी झालेशंभरहून अधिककार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.संघटनेच्या वतीने सांगवीतील पाटबंधारे खात्याच्या मोकळ्या जागेवर मराठाआरक्षणाविषयी  वे राष्ट्रीय अधिवेशन झालेदुपारी दीड ते सायंकाळी  वाजेपर्यंतत्यात खुली चर्चा झालीअधिवेशन शांततेत झालेअधिवेशन शांततेत झालेपरंतुअर्ध्या तासाने त्यास वेगळेच वळण लागलेमराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भातीलआमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवाचर्चा करण्यासाठी त्यांची वेळ घेऊन द्या,असे आवाहन त्यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना केलेत्वरित मुख्यमंत्र्यांशी संफसाधून आम्हांला यासंदर्भात निर्णय द्याअशी आग्रही भूमिका संघटनेचे संस्थापकअध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील  त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलीएक तरमुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणानाही तर आम्हांला अटक कराअसे आव्हान त्यांनीपोलिसांना दिलेत्या वेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असतानाच एकानेअंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केलापरिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊलागताच पोलिसांनी अध्यक्षांसह सुमारे ५० कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये घेतले.पदाधिकारीकार्यकर्त्यांना पोलीस घेऊन जात असतानासंतप्त झालेले कार्यकर्तेपोलीस व्हॅनच्या मागे धावू लागलेत्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.प्रत्युत्तर म्हणून संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केलीयाप्रकरणी शंभरहूनअधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहेत्यामध्ये संघटनेचे संस्थापक जावळेपाटीलकार्याध्यक्ष माणिकराव शिदेविद्यार्थी आघाडीचे प्रमुख विजयकुमार घाडगे,लक्ष्मण शिरसाटमनोज मोरेअभिजित राणे यांच्यासह शंभरहून अधिककार्यकर्त्यांचा समावेश आहे
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारदुपारी  पासूनच अधिवेशन सुरू झाले.त्यास हजारो कार्यकर्ते उपस्थित होतेसांगवीसह हिजवडीनिगडीपिपरीभोसरीपोलीस ठाण्याच्या २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यानजावळे यांचे भाषण दुपारी .१५ ला सुरू झालेअधिवेशनानंतर पुणे-मुंबईमहामार्गावर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केलीअधिवेशनात काँग्रेस अध्यक्षासोनिया गांधीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच अन्य नेत्यांबाबत प्रक्षोभक भाषणेझालीमराठा समाजाला आरक्षण मिळावेया मागणीसाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनासंदेश पाठविण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलेकाहीजणांनी थेट मुख्यमंत्र्यांशीसंवाद साधण्याचाही प्रयत्न केलापणप्रतिसाद  मिळाल्याने अधिवेशनाला हिसकवळण लागलेपोलिसांचा लाठीमारकार्यकर्त्यांची दगडफेक यामुळे पळापळ सुरूझालीकाहीजणांनी एमएच २० एजे ५२९३ या जीपमध्ये अगोदरच आणलेल्या दगडांचामारा सुरू केलात्यात पोलीस जीपच्या (एम.एच१२ .डब्ल्यू ७९४५काचा फुटल्या.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरलीरस्त्यावरील उभ्या वाहनांचेहीदगडफेकीत नुकसान झालेयानंतर तात्काळ दंगल प्रतिबंधक दलाला पाचारणकरण्यात आलेपोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी रात्रीउशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारदुपारी  पासूनच अधिवेशन सुरू झाले.त्यास हजारो कार्यकर्ते उपस्थित होतेसांगवीसह हिजवडीनिगडीपिपरीभोसरीपोलीस ठाण्याच्या २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यानजावळे यांचे भाषण दुपारी .१५ ला सुरू झालेअधिवेशनानंतर पुणे-मुंबईमहामार्गावर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केलीअधिवेशनात काँग्रेस अध्यक्षासोनिया गांधीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच अन्य नेत्यांबाबत प्रक्षोभक भाषणेझालीमराठा समाजाला आरक्षण मिळावेया मागणीसाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनासंदेश पाठविण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलेकाहीजणांनी थेट मुख्यमंत्र्यांशीसंवाद साधण्याचाही प्रयत्न केलापणप्रतिसाद  मिळाल्याने अधिवेशनाला हिसकवळण लागलेपोलिसांचा लाठीमारकार्यकर्त्यांची दगडफेक यामुळे पळापळ सुरूझालीकाहीजणांनी एमएच २० एजे ५२९३ या जीपमध्ये अगोदरच आणलेल्या दगडांचामारा सुरू केलात्यात पोलीस जीपच्या (एम.एच१२ .डब्ल्यू ७९४५काचा फुटल्या.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरलीरस्त्यावरील उभ्या वाहनांचेहीदगडफेकीत नुकसान झालेयानंतर तात्काळ दंगल प्रतिबंधक दलाला पाचारणकरण्यात आलेपोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी रात्रीउशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते