Tuesday, 4 October 2011

बाभळीचे दरवाजे कोणत्याही क्षणी बंद करू


नांदेड। दि. ३ (प्रतिनिधी)
महात्मा गांधी जयंतीदिनी बाभळीच्या आंदोलनाचे फक्त रणशिंग फुंकले होते. हे आंदोलन सुरूच राहणार असून आधुनिक गनिमी काव्याने बाभळीचे दरवाजे कोणत्याही क्षणी बंद करू, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी दिला.
शासकीय विश्रामगृहात त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. २ ऑक्टोबर रोजीचे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले असून गनिमी काव्याने दरवाजे बंद करण्यासाठी पोहून जाणारे कार्यकर्ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे दरवाजे बंद करता आले नाही.. यापुढे छावाचे कार्यकर्ते जलसमाधी, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करतील. गांधी जयंतीपासून सुरू झालेले हे आंदोलन बाभळीचे दरवाजे बंद करण्यापर्यंत थांबणार नसल्याचे जावळे म्हणाले. शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीला रवाना
बाभळी प्रश्नामुळे राज्यातील जनतेवर अन्याय होत आहे. याप्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लक्ष घालून यावर पंतप्रधानांशी चर्चा करावी अशी विनंती करण्यासाठी छावा संघटनेचे शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीकडे रवाना झाले आहे.

No comments:

Post a Comment