Wednesday, 5 October 2011
Tuesday, 4 October 2011
बाभळीचे दरवाजे कोणत्याही क्षणी बंद करू
नांदेड। दि. ३ (प्रतिनिधी) |
महात्मा गांधी जयंतीदिनी बाभळीच्या आंदोलनाचे फक्त रणशिंग फुंकले होते. हे आंदोलन सुरूच राहणार असून आधुनिक गनिमी काव्याने बाभळीचे दरवाजे कोणत्याही क्षणी बंद करू, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी दिला. शासकीय विश्रामगृहात त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. २ ऑक्टोबर रोजीचे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले असून गनिमी काव्याने दरवाजे बंद करण्यासाठी पोहून जाणारे कार्यकर्ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे दरवाजे बंद करता आले नाही.. यापुढे छावाचे कार्यकर्ते जलसमाधी, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करतील. गांधी जयंतीपासून सुरू झालेले हे आंदोलन बाभळीचे दरवाजे बंद करण्यापर्यंत थांबणार नसल्याचे जावळे म्हणाले. शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीला रवाना बाभळी प्रश्नामुळे राज्यातील जनतेवर अन्याय होत आहे. याप्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लक्ष घालून यावर पंतप्रधानांशी चर्चा करावी अशी विनंती करण्यासाठी छावा संघटनेचे शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीकडे रवाना झाले आहे. |
Sunday, 2 October 2011
बाभळीचे पाणी पेटले बंधार्याचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न; कार्यकर्त्यांना अटक व सुटका
(03-10-2011 : 2:05:23)
धर्माबाद। दि. २ (वार्ताहर)
‘छावा’चे अण्णासाहेब जावळे व इतरांना बाभळी बंधार्याकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले.
महात्मा गांधी जयंतीदिनी बाभळी बंधार्याचे दरवाजे बंद करण्याचा इशारा देऊन आंदोलन करणार्या ‘छावा’च्या ४७५ कार्यकर्त्यांना बंधार्यावर पोहोचण्यापूर्वीच अटक करून त्यांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी इळेगाव, बाभळी, मोकली येथे नाकेबंदी केली. चार पोलीस उपअधीक्षक, दहा पोलिस निरीक्षक व ५00 ते ६00 पोलिसांचा ताफा बंदोबस्ताला होता. नदीपात्रात दोन बोटींवर सशस्त्र जवानही तैनात होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आंदोलनामुळे भंग होऊ नये म्हणून मध्यरात्रीपासूनच बाभळी परिसरात प्रशासनाने संचारबंदी लागू केली होती. आंदोलनापूर्वी आयोजित शेतकरी मेळाव्यात ‘छावा’चे संस्थापक अण्णासाहेब जावळे म्हणाले, २00 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला आहे. हे पैसे वाया जाऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आमच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. तर हे काही राजकीय आंदोलन नसून शेतकर्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी अहिंसक लढा आहे. मेळाव्यानंतर बाभळी बंधार्याकडे कूच करणार्या जावळे यांच्यासह लक्षमण शिरसाठ, अप्पासाहेब कोरे, भीमराव पाटील, पंजाबराव काळे, विजय घाडगे, सतीश शिंदे, सुनील बाभळीकर, शिवराज चोळाखेकर आदी कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांनाही चंद्राबाबू नायडू यांच्याप्रमाणे आयटीआयमध्येच ठेवण्यात आले होते.
गनिमी कावा फसला
‘छावा’च्या कार्यकर्त्यांना पोलीस सहज बाभळीपर्यंत जाऊ देतील, अशी स्थिती नव्हती, त्यामुळे काही कार्यकर्ते ७ ते ८ कि.मी. अंतरावरून नदीपात्राने पोहत जाऊन बाभळीचे बंधारे बंद करण्यास निघाले होते; मात्र नदीपात्रात बोटींवर सशस्त्र जवान तैनात करून ठेवल्याने हा प्रयत्न फसला.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=AurangabadEdition-5-1-03-10-2011-cfdb0&ndate=2011-10-03&editionname=aurangabad

बाभळी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप
Sunday, October 02, 2011 AT 01:30 AM (IST)
धर्माबाद - बाभळी बंधारा प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचा इशारा छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांनी प्रशासनाला दिल्यामुळे बाभळी प्रकल्पापासून पाच किलोमीटरपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी शनिवारी (ता. एक) दिले आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर बाभळी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने शनिवारपासूनच परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. "छावा'ने या आंदोलनास शेतकरी मेळाव्याचे स्वरूप देऊन बाभळीपासून पाच किलोमीटर अंतरावर सभामंडप उभारला आहे. या सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी दिली; पण प्रकल्प स्थळापर्यंत जाता येणार नाही. यासाठी दहा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
बाभळी प्रकल्पाजवळ मोठा बंदोबस्त उभारण्यात आला आहे. गोदावदी नदीपात्रात पाणी अधिक असल्यामुळे आंदोलक जलमार्गाने येऊ नयेत, यासाठी दोन बोटी ठेवण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेश सीमेलगतच्या गोदावरी पात्राच्या दोन्ही बाजूंनाही बंदोबस्त वाढविला आहे. बासर येथील नदी पात्रावर आंध्र प्रदेशने बंदोबस्त ठेवला आहे. कुठल्याही गनिमी काव्याने बंधारा परिसरापर्यंत स्थळावर पोचता येणार नाही, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. चार उपविभागीय पोलिस अधिकारी, 15 पोलिस निरीक्षक, 40 उपनिरीक्षक, चारशे जवान, एआरपीची एक कंपनी असा मोठा फोर्स मागविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली.
अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता. दोन) सकाळी कारेगाव येथून मोटारसायकल फेरी काढण्यात येणार अशून बाभळी फाटा येथे शेतकरी मेळाव्यात रूपांतर होणार आहे. शेतकरी, कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील.
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने येत असून, नाकाबंदी करण्यात येत आहे. बाभळी प्रकरणाची अंतिम सुनावणी वारंवार पुढे ढकलत असल्यामुळे हक्काचे पाणी वाहून जाते. आमची मागणी रास्त आहे, असे मत उपजिल्हाप्रमुख सतीश पाटील, तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी व्यक्त केले. या सभेचे नियोजन आता निश्चित असून, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. मोकली, बाभळी, विळेगाव शिवारातही आजपासूनच बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
गनिमी काव्याने बाभळीचे दरवाजे बंद करणार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 01, 2011 AT 01:45 AM (IST)
नांदेड - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी गोदावरी नदीचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या भूमिकेतून गांधी जयंतीच्या दिवशी रविवारी (ता. दोन) गनिमी काव्याने आणि अहिंसक मार्गाने बाभळी बंधाऱ्यावरील दरवाजे बंद करण्यात येतील, अशी माहिती छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांनी दिली.
अखिल भारतीय छावा युवक संघटनेच्या वतीने बाभळी बंधाऱ्याचे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे. त्याची माहिती जावळे पाटील यांनी शुक्रवारी (ता.30) येथे पत्रकारांना दिली. केंद्रीय जल आयोगाने जायकवाडी धरणाच्या खालील भागात गोदावरी नदीवरील साठ टीएमसी पाणी अडविण्याची परवानगी दिली आहे. असे असताना आंध्र प्रदेश सरकार विरोधात भूमिका घेत आहे. महाराष्ट्राची बाजू खरी असताना आणि हक्काचे पाणी असतानाही ते मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आणि जनतेचे नुकसान होत आहे. बाभळी बंधाऱ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली व आंदोलन केले; मात्र त्यांना यश मिळाले नाही कारण राजकीय पक्ष आणि त्यांचे पुढाऱ्यांना "बाभळी'चे फक्त राजकारण करून निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही, आ आरोप जावळे यांनी केला.
आंध्र प्रदेश सरकार आणि नागरिक बाभळी बंधाऱ्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असतील तर महाराष्ट्रातील जनतेने मागे का राहावे? त्यामुळे आता आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत, असे सांगून श्री. जावळे म्हणाले की, जनतेच्या भावना विचारात घेऊन अहिंसक मार्गाने आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची कल्पना पोलिस आणि पाटबंधारे विभागालाही देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्याची आमची इच्छा होती; पण त्यांनी आम्हाला वेळही दिला नाही. जिल्ह्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांना आम्ही आमची भूमिका सांगितली असून या आंदोलनात सहभागी होण्याचे व पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेला "छावा'चे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणबापू शिरसाठ, कार्याध्यक्ष राजेश मोरे, संघटक अण्णासाहेब कुडेकर, छावा विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, शिवा पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तर परवानगी दिलीच कशाला?
महाराष्ट्र सरकारने गोदावरी नदीवर बाभळी येथे सुमारे 200 कोटी रुपये खर्चून बंधारा बांधला. जर या बंधाऱ्यात पाणीच अडवायचे नव्हते तर न्यायालयाने बाभळी बंधारा बांधायची परवानगी दिलीच कशाला? असा प्रश्न अण्णासाहेब जावळे यांनी या वेळी उपस्थित केला. आता न्यायालयात प्रकरण आहे, तुम्ही आंदोलन करू नका असे आम्हाला सांगण्यात आले असले तरी जनतेच्या हितासाठी दहा हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.

Subscribe to:
Posts (Atom)