Sunday, 4 December 2011

पवारांवरील हल्ल्याचा छावा संघटनेकडून निषेध


केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला करणार्या हरविंदरसिंगवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेतर्फे नवी दिल्लीत निदर्शने करण्यात आली. पवारांवरील हल्ल्याचा 'छावा'कडून निषे


नवी दिल्ली। दि. २९ (प्रतिनिधी)
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांनी जंतरमंतर येथे आज निषेध केला. 
हल्लेखोरावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, तसेच या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान पवार यांच्यावर हरविंदरसिंग या माथेफिरू तरुणाने हल्ला केला होता. 
या कृत्यामुळे संसदेत, तसेच संसदेबाहेरही संतापाची लाट उसळली होती. देशातील महागाई भ्रष्टाचाराला पवार एकटे कसे जबाबदार असू शकतात, सरकारचे प्रमुख खर्या अर्थाने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेच आहेत. पवार यांच्यावर हल्ला करून हल्लेखोराने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला जावा, असे जावळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

LOKMAT 30 NOV PAGE NO 2


LOKMAT 30 NOV PAGE NO 2


सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, November 29, 2011 AT 02:45 AM (IST)
Tags: snn,   sharad pawar,   assult,   chawa, 
नवी दिल्ली - केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांनी जंतरमंतर येथे आज निषेध केला. हल्लेखोरावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, तसेच या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान पवार यांच्यावर हरविंदरसिंग या माथेफिरू तरुणाने हल्ला केला होता. या कृत्यामुळे संसदेत, तसेच संसदेबाहेरही संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्‍वभूमीवर छावा संघटनेने जंतरमंतर येथे निदर्शने केली. देशातील महागाई व भ्रष्टाचाराला पवार एकटे कसे जबाबदार असू शकतात, सरकारचे प्रमुख खऱ्या अर्थाने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेच आहेत. पवार यांच्यावर हल्ला करून हल्लेखोराने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला जावा, असे जावळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment