जय भवानी!! जय शिवराय!! जय छावा!!
सस्नेह जय छावा !
अ.भा. छावा मराठा युवा संघटना हि कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली क्रांतिकारी युवकांची ज्वलंत सामाजिक चळवळ म्हणून महाराष्ट्रासह पाच-सहा राज्यात मोठ्या जोमाने वाढत आहे.आज पर्यंत मराठा समाजाने प्रत्येक जातीधार्माला आधार देवून मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे.तोच मराठा समाज आज निराधार बनला आहे.मराठ्यांना कोणीही वाली राहिला नाही.प्रत्येक पक्षातील मराठा पुढार्याने मराठा समाजाचा स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी वापर करून घेतला आहे.महाराष्ट्रातील सत्ता मराठा पुढार्यांच्या हातात असूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.त्यामुळे मराठा समाजाने संघटीत होणे हि काळाची गरज बनली आहे. अ.भा. छावा संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे-पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली दुभंगलेल्या मराठ्यांना एकत्रित करून मराठ्यांवर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे कार्य करून न्याय मिळून देण्याचे काम केले जात आहे.
अ.भा. छावा संघटना गेल्या कित्येक वर्षापासून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत आहे.शेतकऱ्यांच्या, कष्ट्कारांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलने केली वेळ प्रसंगी लाठ्या खाल्या शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडायला आलेल्या अधिकार्याला बांधून मारले.वीज माफीसाठी मुंबईला मोर्चा काढला. सोयाबीनच्या अनुदानासाठी,पीक विम्यासाठी वेगवेगळी आंदोलने केली रास्ता रोको,लाक्षणिक उपोषण,जैल भरो,धरणे आंदोलने अशा विविध प्रकारची आंदोलने करून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून देण्याचे काम केले.
मराठा व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला शासनाच्या कोणत्याही सवलती नाहीत.आरक्षण,शिष्यवृत्ती याचा कोणताही लाभ मिळत नाही.कितीही गुणवंत असला तरी त्याला फक्त आरक्षणामुळे प्रवेश नाकारला जातो.नोकरी मिळत नाही त्यामुळे विद्यर्थी आत्महत्या करीत आहेत.शेतकरी आपल्या मुलांना आर्थिक अडचणीमुळे योग्य शिक्षण देवू शकत नाही.शेतकऱ्याचा मालालाल उत्पादन ख्राचावर आधारित भाव मिळत नाही,विजेचे भारनियम ,नकली बियाणे,खते व कीटकनाश्कांचे प्रचंड भाव यामुळे शेतकरी कर्ज बाजरी होवून आत्महत्या करीत आहे यासाठी आत्ता मराठ्यांनी पुन्हा एकदा संघटीत होवून या शासनाच्या लुटारू व्यापार्यांच्या भ्रष्ट सरकारी अधिकार्यांच्या विरोधात प्रचंड लढा उभारणे आवश्यक आहे.प्रचंड संखेने उपस्थित राहून या मराठा आरक्षण संघर्षात सहभागी व्हावे.
प्रमुख मागण्या
१)मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा.
२)शेत्कायांवर उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा.
३)शेतकर्यांना भारनियमन न करता मोफत विज देण्यात यावी
4)साठ वर्षापेक्षा जास्त वयांच्या शेतकर्यांना पेन्शन देण्यात यावी
5)ATROCITY कायद्याचा दुरुपयोग करून मराठा समाजावर होणारा अन्याय दूर करावा.
६)कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला १००० कोटी रुपये निधी द्यावा
७)इतर आणि स्थानिक मागण्या.
STARTING ON 27 NOV FROM TULJAPUR
hum tumahare sath hai
ReplyDeleteधन्यवाद जय छावा
ReplyDeleteएकच मिशन मराठा आरक्षण