Friday, 23 December 2011

गांज्याचे पीक घेण्यास परवानगी द्यावी अन्यथा कांद्यास २००० भाव द्यावा







शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी नाशिक छावा संघटनेच्या वतीने कांद्याला योग्य भाव द्यावा यासाठी "भीक मागो आंदोलन " करण्य्यात आले जय छावा 
















Monday, 19 December 2011

विद्यार्थी आघाडी सदस्य नोंदणी form

विद्यार्थी आघाडीच्या सर्व पदाधिकार्यांनी सदस्य नोंदणी करून घ्यावी-विजयकुमारघाडगे पाटील (प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी)

विद्यार्थी आघाडी सदस्य नोंदणी form विद्यारही आघाडीच्या पदाधिकार्यांनी आवश्यकतो बदल करावा
 dont forget the last line

SMS ग्रुप जॉईन व्हा टाईप करा ON CHHAWA01 आणि पाठवा 09870807070




JAMES LANE आणि शासनाच्या विरोधात अ.भा. छावा मराठा युवा संघटनेच्या (लातूर जिल्हा) वतीने जिल्हाधिकार्याच्या विरोद्धात कुलूप ठोकले


छावाची गांधीगिरी बंधाऱ्याच्या निकृष्ठ कामाचा फोटो संचालक मंडळास भेट


कापसाच्या हमी भावासाठी छावाचा रस्ता रोको


Wednesday, 7 December 2011

विद्यार्थी आघाडीच्या सर्व पदाधिकार्यांनी सदस्य नोंदणी करून घ्यावी-विजयकुमार घाडगे पाटील (प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी)

विद्यार्थी आघाडी सदस्य नोंदणी form विद्यारही आघाडीच्या पदाधिकार्यांनी आवश्यक तो बदल करावा
 dont forget the last line

SMS ग्रुप जॉईन व्हा टाईप करा ON CHHAWA01 आणि पाठवा 09870807070


Sunday, 4 December 2011

भुजबळ बंद करा वळवळ




भुजबळांविरोधात छावाचे आज आंदोलन 
प्रतिनिधी । लातूर
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी-मराठा जातीविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शुक्रवारी राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे छावा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

जावळे पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात कुणबी मराठा समाजाविषयी वक्तव्य केले होते. कुणबी-मराठा समाजातील लोकांना ओबीसी कोट्यातून एकाही पक्षाने तिकीट देऊ नये. खुद्द राष्ट्रवादीने जरी तिकीट दिले तरी ओबीसींनी त्या उमेदवाराचा पराभव करावा असे वक्तव्य भुजबळांनी केले होते. त्याचा निषेध म्हणून त्यांच्या विरोधात सर्व जिल्हा ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. बापट आयोगाच्या अहवालानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख मराठा समाजाला आरक्षण द्यायला अनुकूल होते. मात्र, गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी त्यावेळी विरोध केला. पुढे येवला मतदारसंघातून भुजबळ स्वत: उभे राहिल्यानंतर आणि समीर भुजबळांच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी छावाची माफी मागून मराठा समाजाची मदत घेतली.

मराठा आरक्षणाला विरोध करणार नाही असे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी कुणबी-मराठा समाजाविषयीचे वक्तव्य करून उपकाराची फेड अपकाराने केली आहे. भुजबळांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देतानाच राष्ट्रवादीने त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी जावळे यांनी केली. 


भुजबळ यांचा जाहीर निषेध

छावा चे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मन बापू शिरसाट यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

छावाचे जोडे मारोआंदोलन                     
लातूर/वार्ताहर
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळांच्या मराठाविरोधी भूमिकेच्या निषेधार्थ लातुरातील शिवाजी चौकात छावा संघटनेच्या वतीने छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन दुपारी एकच्या सुमारास करण्यात आले.
कुणबी मराठा असे जातीचे प्रमाणपत्र असलेल्या कोणत्याही मराठय़ास कुठल्याही पक्षाने ओबीसी कोटय़ातून उमेदवारी देऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरी ती दिली तरी त्याचा पराभव करावा असे सूतोवाच सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केले असून त्यांच्या या भूमिकेच्या निषेधार्थ छावा संघटनेतर्फे शहरातील शिवाजी चौकात दुपारी एकच्या सुमारास छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात छावाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, अ‍ॅड. गणेश गोमचाळे, सोनेराव शिंदे, अ‍ॅड. राजाभाऊ गुंजरगे, दत्ता पाटील, बाळासाहेब सपाटे, बालाजी निकम आदींसह १२ कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली व नंतर सोडून दिले.   
भुजबळांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची पळवापळवी! छावाचे आंदोलन; १२ कार्यकर्त्यांना अटक 

व सुटका
लातूर। दि. (प्रतिनिधी)

मराठा समाजाच्या आरक्षणाला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विरोध होतो, असा आरोप करीत अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न शुक्रवारी शिवाजी चौकात केला. यावेळी पोलिस आणि छावा कार्यकर्त्यांत प्रतिकात्मक पुतळ्याची पळवापळवीही झाली. दरम्यान, आंदोलनकर्त्या १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला कधी विरोध तर कधी बेगडी सर्मथन छगन भुजबळ यांच्याकडून मिळत आहे. शिवाय, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणबी मराठा समाजातील उमेदवारांना कोणत्याही पक्षाने तिकिटे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी पक्षाने दिले, तर त्यांनाही पाडा, असेही छगन भुजबळ यांनी सुचित केले असल्याचा आरोप छावा कार्यकर्त्यांनी यावेळी केला. मराठा समाजाबाबत भुजबळांची ही नकारात्मक भूमिका निषेधार्ह आहे. हा निषेध दर्शविण्यासाठी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आम्ही दहन करीत असल्याचे विजयकुमार घाडगे-पाटील यांच्यासह छावा कार्यकर्त्यांनी सांगितले. 
आंदोलनात विजयकुमार घाडगे-पाटील, राजाभाऊ गुंजरगे, दत्ता पाटील, सोनेराव शिंदे, बाळासाहेब सपाटे, नागेश मुगळे, गणेश गोमचाळे, आकाश पाटील, बालाजी निकम, राजू नरके, संतोष सूर्यवंशी, शिवाजी माने, परमेश्‍वर राऊत, अमोल सपाटे, सिद्धाजी जगताप आदींसह शेकडो छावा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी शिवाजी नगर पोलिसांनी १२ कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांची सुटकाही केली.

प्रतिनिधी। लातूर 


सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी-मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ छावा संघटनेने शुक्रवारी त्यांच्याविरोधात आंदोलन केले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवल्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी पुतळा जप्त करून छावाच्या 12 कार्यकर्त्यांना अटक केली. छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे यांनी गुरुवारी केलेल्या घोषणेनुसार कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्र आले. त्यांनी काही काळ घोषणाबाजी केली. त्यानंतर तेथे भुजबळांचे नाव असलेला पुतळा आणण्यात आला. मात्र, तो पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यानंतर दुसरा पुतळा ताब्यात घेताना पोलिसांची कार्यकर्त्यांशी झटापट झाली. तेवढय़ात उड्डाणपुलावरून तिसरा पुतळा खाली सोडला. त्याला दहन करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कार्यकर्ते आणि पोलिसांत पुन्हा झटापट झाली. अखेर पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला. 
भुजबळांच्या विरोधात ‘छावा’ आक्रमक
PrintE-mail
लातूर/वार्ताहर
राज्याचे बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत असून, १० डिसेंबर रोजी नाशिक येथे छावाच्या वतीने ‘हिसका आंदोलन’ केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुणबी मराठा समाजास ओबीसी कोटय़ातून निवडणुकीची उमेदवारी दिली जाऊ नये. जर अशी उमेदवारी राष्ट्रवादीसकट कोणत्याही पक्षाने दिली तर त्यांच्या विरोधात भूमिका घ्या, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे. त्याचा निषेध छावा संघटनेच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
जातीयवादी भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विरोधात जाणीवपूर्वक भुजबळ यांची भूमिका आहे.
अशा भूमिकेचा   निषेध    करून राज्यभर त्यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे जावळे यांनी जाहीर केले आहे.